Bullock Cart | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Jalgaon Shocker: जळगावात एक दुखद घटना घडली आहे. शेतातून बैलगाडीतून चारा घेऊन घरी परतत असताना बैलगाडी उलटली. बैलगाडी उलटल्याने  बैलगाडीत असलेल्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. गौरव आनंदा पाटील असं मृत मुलाचे नाव आहे.या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. गौरव 13 वर्षाचा होता. (हेही वाचा- अनियंत्रित ट्रकने 6 जणांना चिरडले, 25 हून अधिक जखमी, मध्य प्रदेशातील लग्न मिरवणूकीतील दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील वाकडी गावात ही घटना घडली आहे. गौरव रोज प्रमाणे, वडिलांसोबत बैलगाडीवरून शेतात गेला होता. वाकडी गावात गौरव आई वडिलांसोबत राहत होता. ११ मार्चला शेतातून घरी परतत असताना बैलगाडीत गाई गुरांसाठी चारा भरला होता.हा चारा घेऊन घरच्या दिशेने निघाले होते पंरतु रस्त्याच्या मध्योमध कच्चा रस्त्याच्या अभावामुळे बैलगाडी उलटली. बैलगाडीत भरपूर वजन असल्यामुळे बैलगाडी उलटली. यात गौरव देखील जमिनीवर कोसळला आणि गौरवच्या अंगावर भार आला.

दोन्ही बैलाने देखील उटण्याचा प्रयत्न केला परंतु ते शक्य झाले नाही त्यामुळे चारांमध्ये गौरव दबला गेला आणि एका बाजूचा खिळा त्याच्या डोक्यात घुसला. बराच वेळ गौरव निपचित पडून राहीला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे गौरवच्या कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला. या घटनेची माहिती गावात कळताच, गावकऱ्यांनी शोककळा व्यक्त केली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतला आहे.