महाराष्ट्रात आज (20 डिसेंबर) 7 हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायत निवडणूकांचा निकाल (Gram Panchayat Result) जाहीर होत आहेत. अनेक ठिकाणी विजयी उमेदवार जल्लोष साजारा करत आहेत. पण जळगावात (Jalgaon) एका विजयी मिरवणूकीला गालबोट लागल्याचं समोर आलं आहे. भाजपाच्या दोन गटांमध्येच झालेल्या राड्यात 25 वर्षीय धनराज माळीचा मृत्यू झाला आहे. विजयी मिरवणूकीमध्ये दगडफेक झाली. एक दगड धनराजला लागला आणि त्याचा यामध्ये मृत्यू झाला. दरम्यान जखमी अवस्थेमध्ये धनराजला रूग्णालयात आणण्यात आले होते पण त्याला वाचवण्यात यश आलं नाही.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात शाब्दिक वाद झाले. त्यानंतर मंदिरात दर्शनाला जात असताना दगडफेक सुरु झाली. या दगडफेकीत अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी 25 जणांना ताब्यात घेतले आहे. 25 वर्षांनंतर येथे सत्तांतर झाले होते. आपला पराभव स्वीकारू न शकल्याने ही दगडफेक झाल्याचं मत विजयी गटाने म्हटलं आहे. Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 Live News Update इथे पहा निकालाचे लाईव्ह अपडेट्स.
जळगाव जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर होणार आहेत. 899 जागांसाठी ही निवडणूक होत आहे, त्यात 784 जागा सदस्य पदासाठी तर 115 जागा सरपंच पदाच्या आहेत. दरम्यान जळगावात गुजरात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची लेक भाविका पाटील विजय झाला आहे मात्र पॅनल पराभूत झाले आहे.