Eknath Khadse Welcome in Jalgaon : एकनाथ खडसे यांचे मुक्ताईनगर येथे जंगी स्वागत; जळगावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात प्रथमच प्रवेश
Eknath Khadse | (Photo Credits: Facebook)

भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे मुंबईहून रात्री उशीरा मुक्ताईनगर (Muktainagar) येथे पोहोचले. मुक्ताईनगरला आलेल्या एकनाथ खडसे यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले आहे (Eknath Khadse Welcome in Jalgaon). ढोल ताशे आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे राजकीय जीवनामध्ये एकनाथ खडसे यांनी प्रथमच जळगाव (Jalgaon) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालायात प्रवेश केला. दुसऱ्या बाजूला भाजप कार्यालयाला मात्र या ठिकाणी टाळं लावण्याची वेळ आल्याचे पाहायला मिळाले.

एकनाथ खडसे यांचे जळगाव कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी औक्षण करुन स्वागत केले. या वेळी केलेल्या छोटेखणी भाषणात यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले आज दसरा आहे. दसरा म्हणजे वाईट प्रवृत्तीवर मात करण्याचा दिवस. यापुढेही आपल्याला समाजातील वाईट प्रवृत्तीविरोधात लढा द्यायचा आहे. आपल्याला उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस हा क्रमांक एकचा पक्ष करुन दाखवायचा आहे, असेही खडसे या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Sharad Pawar on Eknath Khadse: नाथाभाऊंमुळे राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढेल, यात माझ्या मनात काहीही शंका नाही- शरद पवार)

एकनाथ एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश मुंबई येथे 22 ऑक्टोबर 2020 या दिवशी पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेश करत असताना कोणत्याही पदाची आपेक्षा ठेवली नाही. इतकेच नव्हे तर खडसे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते नाराज असल्याचे तसेच, एखाद्या मंत्र्याला राजीनामा देऊन ते पद खडसे यांना देण्यात येणार असल्याचे वत्त दिले होते. परंतू, या सर्व वत्ताचे खंडण करत असे काहीही घडणार नाही. कोणत्याही प्रकारे फेरबदल होणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काळात खडसे यांच्यावर कोणती जाबाबदारी देण्यात येते याबाबत उत्सुकता आहे.