आपल्या पुस्तकाला 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' (Aaj Ke Shivaji -Narendra Modi) हे शिर्षक देऊन महाराष्ट्र आणि देशभर वादाचे कारण ठरलेले लेखक जय भगवान गोयल (Jai Bhagwan Goyal) यांच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर (Solapur) येथील शिवसेना कार्यकर्ते दिनकर जगदाळे (Dinkar Jagdale) यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या पुस्तकाचे भाजप (BJP) कार्यालयात काल (12 जानेवारी 2020) प्रकाशन झाले. प्रकाशन झाल्यापासून हे पुस्तक वादाच्या केंद्रस्थानी आहे. महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि त्याबरोबरच समाजातिव विविध घटक या पुस्तकाचा तीव्र स्वरुपात विरोध करताना दिसत आहेत. त्यामुळे हे पुस्तक कायम ठेवले जाणार की मागे घेतले जाणार याबात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दिल्ली येथील भाजप कार्यालयात 'आज के शिवाजी नेरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाश झाले. या प्रसंगी दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी, पक्षाचे उपाध्यक्ष श्याम जाजू आणि माजी खासदार महेश गिरी हे देखील उपस्थित होते. पुस्तकाचे लेखक जय प्रकाश गोयल हे भाजपचे नेते आहेत.
'आज के शिवाजी नेरेंद्र मोदी' या पुस्तकावरुन महाराष्ट्रातील नेत्यांनीही जोरदार टीका केली आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत आणि कोल्हापूरचे खासदार संभाजी राजे यांच्यातही जोरदार ट्विटरयुद्ध पाहायला मिळाले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत 'छत्रपतींशी करण्यात आलेल्या तुलनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काहीच दोष नाही. प्रमुख नेत्यांच्या परोक्ष अनेकदा अशी चमचेगीरी चालते. त्यामुळे प्रमुख नेत्याला अनेकदा अडचणीत यावे लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही कदाचित हे माहिती नसेल की, त्यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अशी काही तुलना केली गेली असेल. परंतू, भाजपने केंद्रातील गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन हे पुस्तक मागे घ्यायला हवे, अशी मगणीही केली आहे. (हेही वाचा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारसदारांनी भाजपमधून राजीनामे द्यावेत; 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तक वादावर शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक)
दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आदी पक्षांनी या पुस्तकावर जोरदार आक्षेप घेत टीका केली आहे. तर दुसऱ्या बाजूला एखाद्या व्यक्तीस एखाद्या राष्ट्रपुरुष अधवा उपमा दिली म्हणून संबंधीत व्यक्ती त्या राष्ट्रपुरुषाइकी मोठी होत नाही. शिवाजी महाराजांची उपमा दिली म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याइतके मोठे होऊ शकत नाहीत. परंतू, असे म्हणण्याची एक पद्धत असते. या आधी शरद पवार यांचाही जानाता राजा म्हणून उल्लेख केला आहे. तसेच, माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनीही माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांदी यांनाबी 'दुर्गा' म्हटले होते. त्यामुळे अशा उपमा दिल्या जातात म्हणून त्या व्यक्ती काही देवत्त्वाइतक्या मोठ्या होत नसतात, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.