रत्नागिरी (Ratnagiri) येथील जगबुडी आणि वाशिष्ठी नद्या मुसळधार पडलेल्या पावसामुळे तुडूंब भरुन वाहत आहेत. त्याचसोबत नद्यांची पातळी वाढत चालली आहे. त्याचसोबत सातारा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे ही मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
राज्यात पडत असलेल्या पासामुळे नद्यांना पूर येत आहे. त्यामुळे त्या मार्गाने जाणाऱ्या वाहनांना अडथळा येत असून धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. खेड तालुक्यात नदीची पातळी 6.40 मीटर ऐवढी झाली आहे. या कारणामुळे नदीकाठावरील लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. तसेच पाण्याची पातळी वाढत असल्याने पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.(लोणावळा येथील भुशी धरण ओवरफ्लो, पर्यटकांना सतर्कतेचा इशारा)
या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना मनस्ताप होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथील पूल पाण्याखाली गेल्याने पुलावरील महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ही वाहतूक गुहागर बायपासवरून वळवण्यात आली आहे.