महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकीची (Maharashtra Vidhan Sabha Election) धामधूम सुरू झाली आहे. तिकीट वाटपासाठी पक्षांची आणि इच्छुकांची तयारी सुरू असताना यंदा आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) देखील निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेना पक्षाकडून समीर वानखेडे निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार समीर वानखेडे शिंदेंच्या तिकीटावर मुंबई मधून विधानसभा निवडणूक लढणार आहेत.
समीर वानखेडे धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आता निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असतील तर समीर वानखेडे यांना आयआरएस पदाचा राजीनामा द्यावा लागेल. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर त्यांचा राजकारणामध्ये प्रवेश होईल. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त Sanjay Pandey आगामी विधानसभा निवडणूकीत दिसणार .
कोण आहेत समीर वानखेडे?
समीर वानखेडे हे आयआरएस अधिकारी आहेत. अंमली पदार्थ नियंत्रण कक्ष (NCB) मुंबई विभागाचे ते माजी संचालक होते. त्यांनी मुंबई मध्ये ड्रग्सच्या विळख्यात अनेक धाडी टाकल्याने चर्चेत आले होते. या कारवाई मध्ये त्यांनी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला देखील अटक केली होती. आर्यन च्या अटकेनंतर समीर वानखेडे चर्चेमध्ये आले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण देखील त्यांच्याच कारवाईने बाहेर आले होते. आपल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 17,000 किलो अंमली पदार्थ आणि 165 किलो सोने जप्त केले आहे.
समीर वानखेडे यांच्या जन्म प्रमाणपत्रावर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भारतीय महसूल सेवा (IRS) मध्ये अनुसूचित जाती (SC) श्रेणी अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी समीर वानखेडेने बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. दरम्यान समीर वानखेडे हे अभिनेत्री क्रांती रेडकर चे पती आहेत. 2017 साली त्यांचे क्रांती सोबत दुसरे लग्न झाले आहे.
महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार आहे तर 23 नोव्हेंबरला निवडणूकीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्यासाठी 15 ऑक्टो