Bhandara Doctor Insults Peon: डॉक्टरकडून शिपायाला अमानुष मारहाण, भंडारा जिल्ह्यातील  गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार, व्हिडिओ व्हायरल
Viral

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला शिवीगाळ आणि अमानुष मारहाण ( Doctor insults Chaprashi) करताना दिसत आहे. सोशल मीडियावरील माहितीनुसार हा भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील (Primary Health Center at Gobarwahi in Bhandara district) असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओत मारहाण करणारी व्यक्ती या केंद्रातील डॉक्टर तर मार खाणारी व्यक्ती येथील शिपाई असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ आरोग्य केंद्रातीलच आहे याबाबत पुष्टी होऊ शकली नाही. मात्र, व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसतो आहे. डॉक्टर पदावर असलेला एखादा व्यक्ती इतक्या टोकाला पोहोचतोच कसा असा सवाल काहीजण उपस्थित करत आहेत.

दरम्यान, डॉक्टरचा इतका संताप का झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही. यात शिपायाने केही चूक केली होती की डॉक्टरनेच अहंकार दुखावल्याने मारहाण सुरु केली याबाबत व्हिडिओतून स्पष्टता होऊ शकत नाही. व्हिडिओत मारहाण करणारा व्यक्ती हा डॉ. कडस्कार असल्याचे सांगितले जात आहे. तर मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव नारायण उइके असे असून या आरोग्य केंद्रात तो शिपाई आहे. डॉक्टर ज्या प्रकारे मारहाण करत आहे ते पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. (हेही वाचा, Pune: गरोदर महिलेस डॉक्टरांकडून अमानुष मारहाण; नामांकित रुग्णालयातील धक्कादायक प्रकार)

व्हिडिओ

व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी डॉक्टरांना सैतानाची उपमा दिली आहे तर काहींनी या प्रकरणाचा तपशील विचारला आहे. दरम्यान, शिपायाच्या बाजूने एकत्र येत काही आदिवसी संघटनांनी डॉक्टर विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. या डॉक्टरवर प्रशासन काय कारवाई करते याबाबत उत्सुकता आहे.