महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरु करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits- Facebook )

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित आढळलेल्या 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला आहे. "कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही. तसेच यासाठी प्रयत्नशील असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्ण बरे झाल्यानंतरही अन्य आजाराचा विळख्यात अडकल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे कोविड19 नंतरच्या उपचाराची व्यवस्था निर्माण होण्याची गरज आहे. यासाठी महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालय सुरु करणार आहेत", असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

नरेंद्र मोदी यांनी आज 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यामध्ये महाराष्ट्रासोबतच गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील उपाययोजनांचा आढावा घेतला आहे. हे देखील वाचा- Shankarrao Gadakh Joined Shiv Sena: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

ट्वीट-

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रात सोमवारी संध्याकाळपर्यंत आणखी 9 हजार 181 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 293 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 24 हजार 513 वर पोहचली आहे. यापैंकी 18 हजार 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.