Subhash Desai And Raj Thackeray (Photo Credit: Facebook/ PTI)

महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) फार काळ टिकेल, असे वाटत नाही. ज्या सरकारमध्ये एकोपा नसतो एकमेकांना विचारले जात नाही ते जास्त काळ टिकणार नाही, असे व्यक्तव्य मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले होते. राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेचा शिवसेनेने समाचार घेतला आहे. शिवसेना नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी शुभ बोल रे नारे... या शब्दात राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार चांगले काम करत आहे. त्यांचे कौतूक केले पाहिजे, असेही सुभाष देसाई यांनी म्हटले आहे. यामुळे मनसे आणि शिवसेनेत वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नुकताच पार पडलेल्या एबीपी माझाच्या कार्यक्रमात सुभाष देसाई सहभागी झाली होते. या कार्यक्रमात सुभाष देसाई यांनी राज ठाकरे यांच्या टिकेवर बोलताना म्हणाले की, शुभ बोल रे नाऱ्या... एवढेच मी बोलेल, सरकार चांगले काम करत आहे. त्यावर चांगले बोलले पाहिजे. सरकार राज्यातील जनतेच्या पाठिशी उभे आहे. आमच्या चुका नक्कीच दाखवल्या पाहिजे. आम्ही त्यातील कमरतता भरून काढू, पण चांगल्या कामाचेही कौतूक करावे, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. हे देखील वाचा- ज्येष्ठ शिवसेना मंत्र्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर 'आता ती वेळ गेली, माहविकासआघाडी सोबतच पुढे जाऊ'

राज ठाकरे काय म्हणाले?

"महाविकास आघाडीच्या सरकारच्या तीन पक्षांमध्ये एकोपा नाही. त्या सरकारमध्ये एकमेकांना विचारले जात नाही. त्यामुळे ते सरकार फार काळ टिकणार नाही. मुख्यमंत्री हे शासकीय पदावर आहेत. त्यांनी बाहेर पडून काम केलेच पाहिजे. मला गेले काही महिने मुख्यमंत्री केवळ टिव्हीवरच दिसले. त्यांचा कारभार दिसलाच नाही. आता कुठे ते कामकाजाला सुरूवात करत आहेत. त्याबद्दल काही अधिक बोलावस वाटत नाही", असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रावर सध्या कोरोनाचे संकट वावरत असून राज्य सरकारकडून योग्य ते उपाययोजना केल्या जात नाहीत, असा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून विरोधीपक्षातील नेते करत आहेत. यात मनसेनेही भर टाकली आहे. यामुळे शिवसेना आणि मनसे यांच्यातील वाद पेटण्याची शक्यता आहे.