Kiran Nagarkar (Photo: Facebook)

ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार आणि पटकथा लेखक किरण नगरकर (Kiran Nagarkar) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. नगरकर यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ब्रेन हॅमरेजमुळे त्यांच्यावर मुंबई (Mumbai) येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र,उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

किरण नगरकर यांचा जन्म 1942 साली मुंबई येथे झाला. नगरकर यांची पहिली कादंबरी 'सात सक्कं त्रेचाळीस' या कादंबरीने त्यांना नवी ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांच्या अनेक कादंबऱ्या गाजल्या आहेत. त्यापैकी 'रावण अँड एडी', 'ककल्ड', 'द एक्स्ट्राज', 'गॉड्स लिट्ल सोल्जर', 'रेस्ट अँड पीस' आणि 'जसोदा: अ नॉवेल' या कादंबऱ्यांनी साहित्यप्रेमींच्या मनावर अदिराज्य गाजवले आहे. एका वृत्तानुसार, किरण नगरकर यांना ब्रेन हॅमरेजमुळे आठवड्यापूर्वी मुंबई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार दरम्यान गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला आहे. नगरकर यांच्यासारख्या साहित्यिक आपल्यात न राहिल्याची बातमी ऐकून साहित्यप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. आज शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. हे देखील वाचा-मला फक्त अर्थव्यवस्थेची चिंता, पी. चिदंबरम यांनी तिहार जेलमध्ये जाण्यापूर्वी दिली प्रतिक्रिया

किरण नगरकर याच्या अनेक कादंबऱ्यांनी साहित्यप्रेमींच्या मनात जागा निर्माण केली आहे. एवढेच नव्हे तर, 'ककल्ड' या कादंबरीसाठी त्यांना २००१ साली साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्याचसोबत हिंदू लिटररी प्राइज, जर्मनीचा ऑर्डर ऑफ मेरिट, ह. ना. आपटे पुरस्कार, दालमिया पुरस्कार या पुरस्कारांनी देखील त्यांना गौरविण्यात आले होते.