जगात सर्वात जास्त प्रमाणात सोन्याची आयात केली जाते. तर यंदा भारतात सोन्याची खरेदी 750-850 टन होणार असल्याची शक्यता आहे. याबद्दल वर्ल्ड गोल्ड काउंसिल यांनी जाहीर केलेल्या एका रिपोर्ट्समध्ये याची अधिक माहिती दिली आहे. डब्लूजीसी नुसार, वर्षाच्या तिसऱ्या महिन्यात लग्नसराईचे दिवस आणि अक्षय्य तृतीया सण असल्याने मुंबईसह अन्य राज्यात जास्त प्रमाणात सोन्याची खरेदीचे प्रमाण वाढणार आहे. भारतात धनतेरसच्या नंतर सोन्याची सर्वात जास्त खरेदी अक्षय्य तृतयेच्या दिवशी केली जाते. तर साडेतीन शुभमुहूर्तांपैकी हे दोन मुहूर्त सोन्याच्या खरेदीसाठी शुभ मानले जातात.
वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात सोने खरेदी करण्यासाठी फायदा झाला आहे. तर 47,010 करोड रुपयांची मागणी यंदाच्या पहिल्या तीन महिन्यात केली गेली आहे. भारतात सोन्याची आयात मुख्यत्वे दागिने बनवण्यासाठी केली जाते. त्यामुळे 5 टक्क्यांनी सोन्याची अधिक मागणी गेल्या वर्षापेक्षा जास्त केली गेली आहे.
गुड ₹ रिटर्न्स (Good₹Returns) यांच्यानुसार मुंबईतील सोन्याचे आजचे दर:
24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम- 31,860 रुपये
24 कॅरेट सोने प्रति 8 ग्रॅम- 25,488 रुपये
24 कॅरेट सोने प्रति 1 ग्रॅम- 3,186 रुपये
तर डब्लूसूजीने आपल्या रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये वाढ दिसून आली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात होणाऱ्या चढउतारामुळे भारतात सोन्याची मागणी थोड्या प्रमाणात कमी झाली आहे.