मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) यांनी नुकतेच मुख्यमंंत्री शासकीय निवासस्थान म्हणजेच वर्षा बंंगल्यावर (Varsha Bunglow) ध्वजारोहण (Flag Hoisting) केले आहे. इथुन पुढे ते मंंत्रालयात सुद्धा ध्वजारोहणासाठी मार्गस्थ होतील. यावेळी, उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) सुद्धा उपस्थित होत्या. राज्यातील कोरोनाचे संंकट लक्षात घेता कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन न करता अत्यंत साध्या स्वरुपात आज ध्वजवंदन करण्यात आले आहे, मुख्यमंंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाउंट (CMO) वरुन या सोहळ्याचे काही खास फोटो शेअर करण्यात आले आहेत. यंंदाच्या स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्र सरकारतर्फे सर्व कोविड वॉरिअर्सचा सुद्धा सन्मान केला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.
74 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाचा सोहळा, ध्वजारोहणाचे इथे पहा थेट प्रक्षेपण
औपचारिक स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र, कोरोना योद्धा, जसे की डॉक्टर, संरक्षक कामगार आणि आरोग्यसेवक यांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती प्रोटोकॉल विभागाने सोमवारी दिली होती. प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात - राज्य मुख्यालयात - त्यांच्या पहिल्या ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील सर्व जिल्हा व विभागीय मुख्यालयात असे समारंभ आयोजित केले जातील जिथे कोविड वॉरिअर्सच्या खास उपस्थितीत ध्वजारोहण केले जाणार आहे.
CMO ट्विट
भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन केले. pic.twitter.com/AhqiCc6zp3
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 15, 2020
दरम्यान आज पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांंच्या हस्ते सकाळी 7 वाजुन 30 मिनिटांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला ज्या नंंतर लाल किल्ल्यावरुन मोदींनी देशवासियांनी संबोधित करत आत्मनिर्भर भारतासाठी पुन्हा एकदा व्होकल द लोकलचा नारा दिला.