महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची (Coronavirus Patient) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत कोरोना चाचण्यांचे (Corona Tests) प्रमाण कमी असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे. आपल्याकडे दररोज 38,000 कोरोना चाचण्या करण्याची क्षमता आहे. परंतु, राज्यात दररोज केवळ 14,000 चाचण्या केल्या जात आहेत. हे अत्यंत धोकादायक आहे. कंटेन्टमेन्ट झोन बाहेर कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने जास्त प्रमाणात चाचण्या करणे हा एकमेव उपाय असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य केलं.
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत आहे. सोमवारी राज्यात 3721 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. तर दिवसभरात 62 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 135796 वर पोहोचला आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. (हेही वाचा - चिंताजनक! पुण्यात आत्महत्येचे सत्र सुरुच; कोरोनाच्या भीतीने एका रिक्षाचालकाने कॅनॉलमध्ये उडी मारून संपवले स्वत:चे जीवन)
We have capacity to do 38,000 tests per day but we're doing only 14,000 tests per day & I think it's dangerous. Now when cases are found more outside containment zones, more testing is the only solution: Devendra Fadnavis, Leader of Opposition in Maharashtra Legislative Assembly pic.twitter.com/yjEdz15uLR
— ANI (@ANI) June 23, 2020
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची आमच्यासोबत येण्याची इच्छा होती, असा गौप्यस्फोट केला. यासंदर्भात पुढे सांगताना ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत येण्याची इच्छा असताना भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांनी शिवसेना सोडून हे आपल्याला करता येणार नसल्याचं म्हटलं होतं. जर शिवसेना सोबत राहून जर राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं असेल तर घेऊ, असंही तेव्हा ठरलं होतं. यासंदर्भात चर्चा झाली होती. परंतु, नंतर सगळं प्रकरण थंड बस्त्यात पडलं, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.