Aurangabad: गाणे बंद केले म्हणून बार व्यवस्थापकाला बेदम मारहाण, औरंगाबाद येथील तरूणांचा राडा
Representative Image (फाईल फोटो)

औरंगाबाद (Aurangabad) येथे गेल्या काही दिवसांपासून गाव गुंडांची दहशत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दरम्यान, गाव गुडांची दशदत मिटवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात असताना जिल्ह्यातून आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. बारमधील (Bar) गाणे बंद केले म्हणून काही तरुणांच्या टोळक्याने व्यवस्थापकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. संबंधित घटना गुरुवारी रात्री उशीरा घडल्याची माहिती समोर येत आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेवर संपूर्ण जिल्ह्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या हिडको परिसरातील लोटस बारमध्ये काही तरूण दारू प्यायला बसले होते. मात्र, दहा वाजल्याने व्यवस्थापकाने बार बंद करण्याचा त्यांना सूचना दिल्या. तसेच बारमध्ये सुरु असलेले गाणे बंद केले. यावर संतापलेल्या तरूणांनी बार व्यवस्थापकाला शिवगाळ करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे व्यवस्थापक आणि तरूणांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर वाद आणखी पेटला आणि संबंधित तरूणांनी बार व्यवस्थापकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात व्यवस्थापक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. एवढेच नव्हेतर, तरूणांनी बारमधील कर्मचाऱ्यांनाही मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे देखील वाचा- Pimpri-Chinchwad Rape: धक्कादायक! नराधम बापाचा पोटच्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, पिंपरी-चिंचवड येथील घटना

गोंदिया येथे काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. मूर्री रेल्वे चौकी येथील येरणे बार येथे बार मालकाला तीन जणांनी मारहाण केली होती. तसेच त्याच्या काऊंटरमधील 19 हजार रुपये रोख आणि चार दारूच्या हिसकावून नेल्या होत्या. याप्रकरणी तिघांविरोधात गोंदिया शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली होती.