Pimpri-Chinchwad Rape: धक्कादायक! नराधम बापाचा पोटच्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, पिंपरी-चिंचवड येथील घटना

देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर (Minor Girl) होणाऱ्या बलात्काराचे सत्र थांबायला तयार नाहीत. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. यातच पुण्यातील (Pune) पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे जन्मदात्या बापानेच पोटच्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad Police) आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी हा काम धंदा करीत नसून त्याची पत्नी घर चालवण्यासाठी सुरक्षा रक्षकाची नोकरी करते. दरम्यान, 1 सप्टेंबर रोजी पीडिताची आई कामावर गेली असता आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर ताबडतोब पीडित मुलीच्या बापाला बेड्या ठोकल्या. या घटनेवर संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीने जोर धरला आहे. हे देखील वाचा- Child Trafficking: मुंबईच्या वांद्रे परिसरात 10 महिन्यांच्या बाळाची 3.5 लाखांत तस्करी, पोलिसांनी तेलंगणामधून सोडवलं 24 तासांत; 4 जण अटकेत

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत गेल्या काही महिन्यांपासून लक्षणीय वाढ झाली आहे. यातच वरील घटनेने आणखी भर घातली असून महिला आता स्वत:च्याही घरात सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे, पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.