Maharashtra Police: गेल्या 24 तासांत एका पोलिसाला COVID-19 ची लागण; कोरोना बाधित महाराष्ट्र पोलिसांची एकूण संख्या 2562 वर
Maharashtra Police | (PTI photo)

महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्व कोविड योद्धा (Covid Warriors) दिवसरात्र एक करून ऑनफिल्ड काम करत आहे. यामुळे अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात एक दिलासादायक बातमी म्हणजे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र पोलिसांना (Maharashtra Police) देखील झपाट्याने कोरोनाची लागण होत होती. मात्र गेल्या 1-2 दिवसांपासून या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. मागील 24 तासांत एका पोलिसाला कोरोनाची लागण झाली असून ही संख्या आतापर्यंत एकूण 2562 महाराष्ट्र पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

याचबरोबर आतापर्यंत एकूण 33 महाराष्ट्र पोलिस कोरोनामुळे दगावल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधित रुग्ण आढळून आल्याने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तेथे सर्वोतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. Coronavirus चा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सांगितली सर्व राशींना लागू होईल अशी भविष्यवाणी, पाहा आजचे राशिभविष्य

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 82 हजार 898 वर पोहचली आहे. यापैकी 37 हजार 390 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 2 हजार 969 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

भारतात गेल्या 24 तासांत 9971 नवे कोरोना संक्रमित आढळले असून देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,46,628 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत एकूण 6929 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.