Coronavirus Cases In Pune: राज्यात कोरोना विषाणूने कहर केला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, आदी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुण्यात आज 992 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज दिवसभरात 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 48 हजार 57 इतकी झाली आहे.
पुणे शहरात आज 1 हजार 175 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता 28 हजार 593 इतकी झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मनःपूर्वक धन्यवाद मानले आहेत. (हेही वाचा - Coronavirus: राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोना विषाणूची लागण)
पुणे कोरोना अपडेट : रविवार, २६ जुलै,२०२०
शहरात नव्याने ९९२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या ४८०५७ झाली आहे. तर १,१७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या १८,२९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता २,४४,०४७ झाली असून आज २,५०६ टेस्ट घेण्यात आल्या pic.twitter.com/jvN4Qt9Qgn
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 26, 2020
दरम्यान, सध्या पुणे शहरात 18 हजार 298 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर शहरात आतापर्यंत एकूण 2 लाख 44 हजार 47 जणांची तपासणी करण्यात आली असून आज 2506 टेस्ट घेण्यात आल्या आहेत. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 18 हजार 298 रुग्णांपैकी 682 रुग्ण गंभीर आहेत. यातील 105 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर तर 682 रुग्ण हे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. यासंदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.