Nashik Murder Case: अखेर नाशिकमधील 'त्या' दुहेरी हत्याकांडाचा तपास लागला, प्रॉपर्टीच्या लोभापायी शेजाऱ्यानेच घेतला बाप-लेकाचा बळी
Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

नाशिक (Nashik) येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे 70 वर्षीय निवृत्त कुलसचिव आणि त्यांच्या 35 वर्षीय डॉक्टर मुलाची व्यावसायिकाने हत्या (Murder) केली. यानंतर सुमारे दोन महिन्यांनी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) बुधवारी त्याला अटक केली. या व्यवसायिकाच्या शेजारी पिता-पुत्राची हत्या त्यांच्या मालमत्ता हडपण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेला आरोपी राहुल जगताप हा याच इमारतीत पीडित नानासाहेब कापडणीस आणि मुलगा अमित यांच्यासोबत राहत होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आठ ते दहा दिवसांच्या अंतराने ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही हत्या एकाच पद्धतीने झाल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे.

पीडितांना कारमध्ये बसवून बेशुद्ध केले आणि त्यानंतर त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आली. पहिला खून झालेल्या नानासाहेबांचा मृतदेह जगताप यांनी पालघर जिल्ह्यातील आंबिवली घाटात फेकून दिला होता. त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी अमितचा खून करून त्याचा मृतदेह अहमदनगर जिल्ह्यातील जंगलात फेकून दिला होता. संबंधित स्थानिक पोलिसांनी मृतदेह शोधून काढले होते. हेही वाचा Crime: प्रियकराला यायची सारखी एक्स गर्लफ्रेंडची आठवण, ईर्षेपोटी प्रेयसीने केला त्या मुलीचा न्यूड फोटो व्हायरल

अज्ञात आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवले होते. परंतु पीडितांची ओळख पटू न शकल्याने त्यांना या प्रकरणात कोणताही सुगावा मिळाला नाही. पालघरमधील मोखाडा पोलिसांनी आणि अहमदनगरमधील राजूर पोलिसांनी मृतदेहांचे वर्णन असलेले त्या वयोगटातील कोणी नाशिकसह शेजारील जिल्ह्यात बेपत्ता झाले आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणत्याही व्यक्तीने हरवल्याची तक्रार दाखल न केल्यामुळे त्यांना कोणताही सुगावा लागला नाही.