प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Nagpur Shocker: नागपूर (Nagpur) शहरातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या एका महिलेने आपल्या 80 वर्षीय सासूवर हल्ला करून तिची हत्या (Murder) केली. यासंदर्भात पोलिसांनी माहिती दिली आहे. शनिवारी झालेल्या या हत्येप्रकरणी पोलिसांनी पुनम आनंद शिखरवार (36) हिला अटक केली आहे.

पुनम या मानसिक विकाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. मात्र, आरोपीने गेल्या काही आठवड्यांपासून औषधे घेणे बंद केले होते. तसेच तिच्या कुटुंबीयांशी भांडण केले होते. रागाच्या भरात आरोपीने अचानक सासू तारादेवी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा गळा चिरला. आरोपी सूनेने वृद्ध सासूवर अनेक वेळा वार केले. (हेही वाचा - Bombay HC On Mental Asylums: लोकांनी गरज नसताना मानसिक आश्रयस्थानात राहू नये; मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण)

यासंदर्भात शेजारच्यांना माहिती मिळताच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपी महिलेविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, 21 ऑगस्ट रोजी नागपुरातील एका गावात एका कार्यक्रमादरम्यान डान्स करण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीने जोडप्यावर चाकूने वार करून जखमी केले होते. ही घटना रविवारी रात्री खरसोली गावात घडली. आरोपी दिनेश सुभाषराव पाटील याने शेजारी सुखदेव उईके आणि त्यांची पत्नी रेखा यांच्यावर नामकरण समारंभात नाचण्यास नकार दिल्याने हल्ला केला होता.

पाटील यांनी उईके यांना त्यांच्यासोबत नृत्य करण्याची विनंती केली. परंतु त्यांनी नकार दिला. तथापि, पीडितेने नंतर यजमानाच्या सांगण्यावर नाचण्यास सुरुवात केल्याने आरोपी संतापला. पाटील यांनी उईके यांना शाब्दिक शिवीगाळ केली आणि कार्यक्रमातून बाहेर पडत असताना त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.