Coronavirus Cases In Jalna: जालना जिल्ह्यात आज 19 जणांना कोरोना व्हायरसची लागण
Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

जालना (Jalna) जिल्हयात आज 19 जणांना कोरोना विषाणूची (Coronavrius) लागण झाली आहे. बाधितांमध्ये जाफराबाद शहरातल्या 18 जणांसह घनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 248 इतकी झाली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. बुधवारी जिल्ह्यातील तीन जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तर मंगळवारी जालना जिल्ह्यात 14 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये जालना शहरातील बालाजीनगर येथील 5, मोदीखाना 2, गुडलागल्ली 1, सरस्वती मंदीर परिसरातील 3, बेथल ता. जालना 2, सोनपिंपळगाव तालुका अंबड येथील एका रुग्णांचा समावेश होता. (हेही वाचा - Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात कोविड-19 चे किती रुग्ण? जाणून घ्या कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी एका क्लिकवर)

दरम्यान, बुधवारी जालना जिल्ह्यातील 17 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे या सर्व रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 94,041 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 44,517 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 46074 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याशिवाय आतापर्यंत 3438 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.