Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) आज सकाळी 87 रुग्णांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाली असून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2622 वर पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यात 1087 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 135 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत 1400 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

दरम्यान, प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये इंदिरा नगर (1), हिना नगर (1), बेगमपुरा (1), सिडको (1), चिकलठाणा (2), उस्मानपुरा (1), हिमायत बाग (1), समता नगर (1), संजय नगर, बायजीपुरा (1), महेश नगर (1), देवगाव रंगारी (1), एन अकरा, हडको (1), एन सहा सिडको (2), मयूर नगर, एन अकरा (1), बायजीपुरा गल्ली नं. सत्तावीस (3), जुना मोंढा गवळीपुरा (1), माया नगर, एन दोन, सिडको (1), शाहू नगर, सिल्लोड (1), हडको एन अकरा (1), करीम कॉलनी (1), कोहिनूर कॉलनी (1), जवाहर कॉलनी (2), गजानन कॉलनी (1), राहुल नगर (1), बिस्म‍िल्ला कॉलनी (1), शहागंज, मंजूरपुरा (1), हडको एन अकरा (1), चिंचोली (1), उस्मानपुरा (1), गारखेडा (1), बायजीपुरा (1), वेदांत नगर (1), पद्मपुरा (1), मथुरा नगर (1), रोशन गेट (1), सिल्म मील कॉलनी (1), गादिया ‍विहार (3), एन नऊ सिडको (5), उत्तम नगर (1), बुद्ध विहार (1), न्यू हनुमान नगर (1), बन्सीलाल नगर (1), बेगमपुरा (4), जयभीम नगर (1), शहागंज (2), रेहमानिया कॉलनी (1), भवानी नगर (1), लक्ष्मी नगर (2), एन दोन सिडको (2), सुंदरवाडी (4), सह्याद्री हाऊसिंग सोसायटी (1), बजाज नगर (2), सलामपूर,पंढरपूर परिसर (2), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (1), गणेश नगर, पंढरपूर (2), फतेहमैदान , फुलंब्री (6), फतियाबाद, गंगापूर (1), शिवराई, गंगापूर (1), मुस्तया पार्क, वैजापूर (1) या भागातील रुग्णांचा समावेश आहे. आहेत. यामध्ये 60 पुरूष आणि 27 महिलांचा आहेत. (हेही वाचा - मुंबईत कोरोनाचा हाहाकार! आज दिवसभरात 69 जणांचा मृत्यू, तर 1383 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाकडून कोरोना संक्रमणावर आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. याशिवाय महाराष्ट्र आज 3,427 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 113 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.