मुंबईत (Mumbai) कोरोनाचा (Coronavirus) हाहाकार माजला आहे. आज दिवसभरात मुंबईत 69 जणांचा मृत्यू झाला असून 1383 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 56740 वर पोहचली आहे. आतापर्यंत मुंबईत 2111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Municipal Corporation Greater Mumbai) माहिती दिली आहे.
मुंबईतील धारावी, दादर, वरळी, मानखुर्द, वांद्रे, अंधेरी भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. आज मुंबईतील धारावी झोपडपट्टीत कोरोनाचे 17 नवे कोरोना रुग्ण सापडले आहे. राज्यात सर्वाधित कोरोना रुग्ण एकट्या मुंबई शहरात सापडत आहेत. त्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज 795 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांमध्ये 47 पुरुष, तर 22 महिलांचा समावेश होता. (हेही वाचा - Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 3,427 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 113 जणांचा मृत्यू)
69 deaths and 1383 new positive cases of COVID-19 reported in Mumbai today. The total number of positive cases in #Mumbai is now 56740. The death toll is at 2111: Municipal Corporation Greater Mumbai pic.twitter.com/yZeySX6gCT
— ANI (@ANI) June 13, 2020
दरम्यान, आज महाराष्ट्रात 3,427 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 113 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1,04,568 वर पोहोचली आहे. याशिवाय आतापर्यंत राज्यात 3830 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असून कोरोना ग्रस्तांचा आकडा 3 लाखांच्यावर पोहोचला आहे.