Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात (Maharashtra) आज 3,427 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 113 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,04,568 वर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत राज्यात 3830 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने (State Health Department) माहिती दिली आहे.

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद जिल्ह्यात आढळून येत आहेत. याशिवाय ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा संसर्ग वाढ आहे. आज मुंबईतील धारावी परिसरात 17 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. (हेही वाचा - मुंबईतील धारावीत आज नव्याने 17 कोरोनाच्या रुग्णांची भर पडल्याने आकडा 2 हजारांच्या पार, मुंबई महापालिकेची माहिती)

दरम्यान, भारतात गेल्या 24 तासातं कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एका दिवसात कोरोनाचे 11,458 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 लाख 8 हजार 993 वर पोहोचली आहे. यातील 1 लाख 45 हजार 779 रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत 1 लाख 54 हजार 330 जणांनी कोरोनावर मात केली आह. मात्र, कोरोना विरोधात झुंज देताना 8884 जणांचा बळी गेला आहे.