Imtiyaz Jaleel | ((Photo credit: archived, modified, representative image))

Lok Sabha Election Results 2019: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाला जबरदस्त धक्का बसला आहे. गेली चार वेळा सलग खासदार म्हणून निवडूण आलेल्या शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे धक्कादायकरित्या पराभवाच्या छायेत आहेत. एमआयएम आमदार आणि वंचित बहुजन आघाडी उमेदवार इम्तियाज जलील यांनी खैरे यांच्यावर आघाडी घेतली आहे. शिवसेनेसाठी वंचित आघाडीचे वाढते मताधिक्य आश्चर्यकारक मानला जात आहे.

औरंगाबाद मतदारसंघातून या वेळी काहीतरी  वेगळा निकाल येईल असे सुरुवातीपासूनच संकेत मिळत होते. राज्यभरात शिवसेना-भाजप युती असताना औरंगाबाद येथे मात्र दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा म्हणावा तसा मेळ झाला नव्हता. तसेच, स्वत: भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीच खैरे यांच्या पराभवासाठी प्रयत्न केल्याचे. तसेच, हा पराभव व्हावा म्हणून जावई हर्षवर्धन जाधव यांना छुपा पाठिंबा आणि आर्थिक मदत केल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केला होता.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांना प्रथम क्रमांकाची मते मिळताना दिसत आहे. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना क्रमांक दोन तर, शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांना क्रमांक तीनची मते मिळत असल्याचे चित्र आहे. (हेही वाचा, Lok Sabha Election Results 2019: पार्थ पवार लढत असलेली मावळची जाग जिंकू असे आम्हाला कधीच वाटले नव्हते: शरद पवार)

दरम्यान, महाराष्ट्र आणि देशभरातील एकून चित्र पाहता जनमताचा कौल हा भाजप आणि एनडीएच्या बाजूने पाहायला मिळतो आहे. तर काँग्रेस आणि यूपीएच्या विरोधात जनतेने कौल दिल्याचे दिसते.