IIT Bombay in Powai | Representative Image | (Photo Credits: PTI)

IIT-Bombay Student Darshan Solanki Suicide Case: आयआयटी मुंबई (IIT Mumbai) येथील विद्यार्थी दर्शन सोळंकी (Darshan Solanki) आत्महत्या प्रकरणात (IIT-Bombay Suicide Case) मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला आहे. शिवाय आरोपीवर असलेल्या जातीभेद आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आोरोपावरही न्यायालयाने भाष्य केले. न्यायालयाने म्हटले आहे की, आत्महत्या करण्यापूर्वी आरोपीने जरी सुसाईड नोटमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला असला तरी गुन्हा सिद्ध करण्यासाठी तेवढा निष्कर्ष पुरेसा ठरणार नाही. न्यायालयाने शनिवारी दिलेल्या आदेशात असेही म्हटले आहे की अमन खत्री याने जातीय भेदभावाच्या कारणावरून दर्शन सोळंकीचा (Darshan Solanki Suicide) छळ केला होता किंवा त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले होते, असे काहीही रेकॉर्डवर नाही.

आयआटी मुंबई येथील दुसऱ्या वर्गात शिकणारा विद्यार्थी दर्शन सोळंकी याने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी अमन खत्री नामक एका विद्यार्थ्यास 9 एप्रिल रोजी अटक केली. या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए पी कानडे यांनी शनिवारी त्याला जामीन मंजूर केला. त्याची सविस्तर ऑर्डर बुधवारी (10 मे) उपलब्ध झाली.

मूळचा अहमदाबाद येथील असलेला आणि बी टेक (केमिकल) अभ्यासक्रमाचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी असलेल्या दर्शन सोळंकीचा उपनगरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IITB) च्या कॅम्पसमधील वसतिगृहाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून मृत्यू झाला. पहिल्या सेमिस्टर परीक्षा संपल्याच्या एका दिवसानंतर त्याने पवई येथे 12 फेब्रुवरी रोजी आतमहत्या केली.

ट्विट

तीन आठवड्यांनंतर, मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) दर्शन सोळंकी याच्या खोलीतून ‘अरमानने माझी हत्या केली आहे’ अशी एक ओळीची चिठ्ठी सापडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जदाराने (खत्री) दर्शन सोळंकी याला त्याच्या मुस्लिम धर्माविषयी आक्षेपार्ह बोलल्याने पेपर कटरने जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही समोर आले आहे.

तथापि, अमन खत्रीने त्याच्या जामीन अर्जात दावा केला की त्याचा कथित गुन्ह्याशी कोणताही संबंध नाही आणि घटनेच्या जवळपास दोन महिन्यांनंतर त्याला संशयावरून अटक करण्यात आली.