महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभेचा निकाल लागून अनेक दिवस उलटले तरीदेखील राज्यात सत्ता स्थापन झाली नाही. भाजप- शिवसेना (BJP-ShivSena) महायुतीला या निवडणुकीत अधिक जागा मिळाल्या असल्या तरीदेखील मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात वाद सुरु आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (National Congress Party) आमदार नवाब (Nawab Malik) यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. भाजप-शिवसेनेने राज्यात सरकार स्थापन केले नाही तर, काँग्रेस-राष्ट्रवादी पर्यायी सरकार बनविण्याचा प्रयत्न करेल, असे नवाब मलिक म्हणाले आहेत. तसेच राज्यातील परिस्थितीबाबत राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक बोलवणार असल्याचे ते म्हणाले आहेत.
विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी संपला असून अजूनही राज्यात राजकीय वाद सुरुच आहे. लोकसभा निवडणुकीच्या नंतर अडीच वर्षे भाजप तर, उर्वरीत वर्ष शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री असेल अशी दोन्ही पक्षात बोलणी झाली होती, असा दावा शिवसेना करत आहे. तर आमच्यात अशी काहीच बोलणी झालीच नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यामुळे दोन्ही पक्षात तिढा निर्माण झाली आहे. यातच राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी सत्ता स्थापनेसंदर्भात वक्तव्य केले आहे. पत्रकारांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, जर भाजप-शिवसेना सरकार स्थापन केले तर, आम्ही विरोधी पक्षात बसू, परंतु महायुती सरकार स्थापन बनवत नसेल, तर काँग्रेस-राष्ट्रवादी पर्यायी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करेल. तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी आम्ही 12 नोव्हेंबर रोजी आमच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे, असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Maharashtra Government Formation: राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानंतर तरी सत्तास्थापन करुन बहुमत सिद्ध करावं: संजय राऊत यांच्या भाजपाला शुभेच्छा
एएनआयचे ट्वीट-
Nawab Malik, NCP: If BJP-Shiv Sena form the govt, we will sit in Opposition. If they don't form govt then Congress-NCP will try to form an alternate govt. We have called a meeting of all our MLAs on 12th November to discuss the political situation in the state pic.twitter.com/tsrltQLxCZ
— ANI (@ANI) November 10, 2019
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून सत्ता स्थापनेवरुन वाद निर्माण सुरु आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली होती. परंतु, या निवडणुकीत भाजपने अधिक जागा मिळवल्या तरीदेखील बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांनी शिवसेना पक्षाची गरज भासत आहे. यामुळे शिवसेनाही आपल्या भुमिकेवर ठाम आहे.