Amit Shah | | (Photo Credits: Facebook)

Amit Shah to Visit Lalbaugcha Raja: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) आज मुंबईत दाखल  होणार आहे. आज मुंबईत लालबागच्या राजाचं( Lalbaugcha Raja)दर्शन घेणार आहे. नंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच एका कार्यक्रमात सहभागी होणार आले.मिळालेल्या माहितीनुसार,  दोन वाजता मुंबई विमानतळावर दाखल होणार आहे, संध्याकाळी सात वाजता अमित शाह दिल्लीला रवाना होणार आहे.

सर्वात आधी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहे. तिथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणरायाचे दर्शन घेणार आहे. वांद्रे येथील भाजप नेते आशिष शेलार यांच्या  सार्वजनिक गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहे. त्यानंतर मुंबई विद्यापीठात  लक्ष्मण राव इमानदार स्मृती व्याख्यान कार्यक्रमात सहभागी होणार आहे. तिथून सांयकाळी सात वाजता अमित शाह दिल्लीला रवाना होणार आहे.

यंदा ही अमित शाहा सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहे. आज मुंबई शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा लालबागच्या राजाच्या दरबारात 25 मिनटं असणार आहेत. त्यासाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलीस विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवणार आहेत.