Photo Credit - X

Pooja Khedkar Controversy: आयएएस पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पूजा खेडकर त्यांच्या ऑडी कारमुळे चर्चेत आल्या होता. पुणे वाहतुक पोलिसांनी पूजा यांची आलिशान कार जप्त केली आहे. आलिशान कारवर बेकायदेशीरपणा लाल दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहल्यामुळे त्या अडचणीत आल्या. या घटनेनंतर पुणे पोलिस अॅक्शन मोडवर आले आहे. (हेही वाचा- आयएएस अधिकारी पूजा खेडकरशी संबंधित वादांची चौकशी होणार; उमेदवारी तपासण्यासाठी केंद्राने स्थापन केली समिती (Watch)

मिळालेल्या माहितीनुसार, आयएएस पूजा खेडकर यांच्या सोबत त्यांच्या आई मनोरमा आणि वडिलांच्या ही अडचणी वाढल्या. आयएएस ट्रेनी पूजा खेडकर यांनी खासगी ऑडी कारवर महाराष्ट्र शासन आणि (परवानगिशिवाय) लाल दिवा लावला, जे की बेकायदेशीर आहे. या घटनेनंतर त्यांची पुण्याहून वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली. पाच दिवसांनंतर शनिवारी रात्री ही आलिशान ऑडी कार पुणे वाहतुक पोलिसांनी पूजा यांच्या बंगल्यावरून जप्त केली.

पूजा खेडकर यांच्या ऑडी प्रकरणात पुणे पोलिसांनी कागदपत्रे तपासणीसाठी त्यांना नोटीस बजावली होती. परंतु कागदपत्रे तपासणी दरम्यान त्या गैरहजर राहल्या. त्यानंतर पुणे पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरु केली. ऑडी कार संदर्भात त्यांना २७ हजाराचा दंड भरावा लागला. ऐवढ्यात नाही तर हळूहळू त्यांच्या अनेक अडचणी वाढ झाले. आयएएस परिक्षेत पद मिळवण्यासाठी त्यांनी अंपगत्व आणि मागासवर्गीय कोट्याचा गैरवापर केल्याचं आरोप आहे.