BMC (Photo Credits: Twitter)

सध्या जगभरात थैमान घालत असलेला कोरोना व्हायरस आता मुंबई शहरामध्येही आपला विळखा घट्ट करत आहे. दरम्यान मुंबई शहरातील वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या आता चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे हे संकट रोखण्यासाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी IAS अधिकारी अश्विनी भिडे आणि एन रामास्वामी यांची मुंबई महानगर पालिकेमध्ये नियुक्ती केली आहे. या दोघांवरही कोरोना व्हायरसचं संकट रोखण्यासाठी प्रबंधात्मक व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी विविध उपाययोजना करणार आहेत. मुंबई मेट्रो प्रोजेक्ट मध्ये आरे कार शेड आणि तेथील वृक्षांच्या तोडणीमुळे पेटलेल्या वादानंतर अश्विनी भिडे या ठाकरे सरकारच्या निशण्यावर होत्या. त्यानंतर त्यांना मेट्रो प्रमुख पदावरून देखील हटवले होते. आता मुंबई महानगर महापालिकेमध्ये कोरोना संकटात 'कोरोना वॉर रूम' बनवली जाणार आहे. त्याच्या प्रमुख सम्न्वयक म्हणून अश्विनी भिडे जबाबदारी स्वीकारतील. Coronavirus in Maharashtra: मुंबई, पुणे, बुलढाणा येथे कोरोनाचे 5 नवे रुग्ण; महाराष्ट्र राज्यातील कोरोना व्हायरस बाधितांची संख्या 225 वर.  

डॉ. एन रामास्वामी हे हेल्थ कोओरर्डिनेशन पदाची जबाबदारी सांभाळतील. अ‍ॅडिशनल कमिशंर सुरेश काकानी त्यांची मद्त करतील. डॉ. रामास्वामी यांनी यापूर्वी नवी मुंबई महानगर पालिकेमध्ये कमिशनर पदाची जबाबदारी सांभाळली आहे.

शहराच्या दृष्टीने विचार केल्यास मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. काल रात्री पर्यंत मुंबई शहर आणि उपनगरांचा विचार करता हा आकडा 170 पर्यंत पोहचला होता. तसेच सोमवारी रात्री वरळी कोळीवाडा भागातूनही कोरोनाबाधित संशयित रूग्णांचा मोठा आकडा समोर आल्याने आता भविष्यात कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांमध्ये वाढ होऊ शकते. आज दुपरनंतर सुमारे42 कोरोना संशयितांचे रिपोर्ट येणार आहेत. यामध्ये वरळी, गोरेगाव मधील बिंबिसार नगर येथील रहिवासी सोसाट्यांच्या समावेश आहे.