Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

Uddhav Thackeray on BJP: विरोधकांकडे पंतप्रधान पदाचा चेहराच नाही, अशी टिका करणाऱ्या एनडीए आणि भारतीय जनता पक्षाला शिवसना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही 'इंडिया आघाडी'ची काळजी करु नका. आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे आहेत. भाजपकडे नरेंद्र मोदी यांचा वगळता कोणता चेहरा आहे? असा थेट सवाल ठाकरे यांनी विचारला आहे. 'I-N-D-I-A Alliance' ची बैठक मुंबई येथे उद्या (31 ऑगस्ट) पार पडत आहे. या बैठकीपूर्वी महाविकासाघाडी द्वारा आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रकाश आंबेडकर आणि आमची (शिवसेना-UBT) युती

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान जोरदार फटकेबाजी केली. प्रकाश आंबेडकर आणि आमची (शिवसेना-UBT) युती झालेली आहे. आम्ही ती जाहीर केलेली आहे. त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही. मात्र त्यांची जर इच्छा असेल. ती त्यांनी तशी व्यक्त केली तर त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकासआघाडीमध्ये घेण्यासाठी विचार केला जाईल, असे ते म्हणाले.

ज्यांच्यासोबत असतो त्यांच्यावर टीका करतो

उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकासआघाडी आणि इंडिया आघाडीत आहे. तर असे असतानाही मुखपत्र दैनिक सामनामधून शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका कशी केली जाते? असा सवाल पत्रकारांनी केला. त्याला तितक्या मिश्कीलपणे उत्तर देत उद्धव ठाकरे म्हणाले. 'आम्ही ज्यांच्यासोबत असतो त्यांच्यावर टीका करतो'. त्यांच्या या विधानामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आणि वातावरण हलकेफुलके झाले.

ट्विट

उद्याच पंतप्रधान पदाची शपथ घेतो

शिवसेनेच्या काही नेत्यांकडून उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील. ते पंतप्रधान होतील असा दावा केला जात असे प्रसारमाध्यमांनी विचारता त्यालाही उद्धव ठाकरे यांनी मिश्कील उत्तर दिले. 'ठिक आहे.. आता उद्याच जातो आणि शपथ घेतो', असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा टोलेबाजी केली.