MLA Sanjay Gaikwad Claims To Have Hunted A Tiger: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटातील शिवसेना आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी 80 च्या दशकात वाघाची शिकार (Tiger Hunting) केली होती, असा धक्कादायक दावा केला आहे. त्याच्या गळ्यात असणारा दात हा त्या वाघाचा आहे, असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना-यूबीटी गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाने यासंदर्भातील व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट केला आहे.
शिवजयंतीनिमित्त सोमवारी बुलढाण्यात आयोजित कार्यक्रमात शिवसेना आमदार संजय गायकवाड सहभागी झाले होते. यावेळी ते खास पोशाखात दिसले. याच कार्यक्रमात संजय गायकवाड यांनी गळ्यात मोत्यांच्या माळा व्यतिरिक्त एक दात घातला होता. याबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता संजय गायकवाड यांनी दावा केला की, हा वाघाचा दात आहे. 1987 मध्ये मी वाघाची शिकार करून त्याचे दात काढले होते. (हेही वाचा -Shiv Sena MLA Sanjay Gaikwad: महाराज लोकांनी मंडपातून बायका पळवल्या तेव्हा संप्रदाय बदनाम नाही झाला का? शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा सवाल)
संजय गायकवाड हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. प्राप्त माहितीनुसार, हा व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती म्हणजेच 19 फेब्रुवारीचा आहे. वास्तविक, वाघाची शिकार भारतात बेकायदेशीर आहे आणि 1987 पूर्वीही ती बेकायदेशीर घोषित करण्यात आली होती. अशा परिस्थितीत गायकवाड यांचा दावा खरा ठरल्यास ते कायदेशीर अडचणीत येऊ शकतात. ('पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर', देवेंद्र फडणवीसांवर वादग्रस्त वक्तव्य करणा-या संजय गायकवाडांवर नितेश राणे यांची जहरी टीका)
पहा व्हिडिओ -
1987 ला मी वाघाची शिकार केली. तो दात माझ्या गळ्यात आहे"आमदार संजय गायकवाड यांची शिवजयंतीच्या कार्यक्रमात धक्कादायक कबुली#Sanjaygaikwad #Viralvideo #Saamanaonline pic.twitter.com/ssn4u0izdp
— Saamana (@SaamanaOnline) February 22, 2024
दरम्यान, सामनाने आपल्या सोशल मीडिया हँडलवर गायकवाड यांचा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे की, '1987 ला मी वाघाची शिकार केली. तो दात माझ्या गळ्यात आहे"आमदार संजय गायकवाड यांची शिवजयंतीच्या कार्यक्रमात धक्कादायक कबुली' हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, देशात वाघाची शिकार बेकायदेशीर असल्याने आमदारावर कारवाई करावी, अशी मागणी नेटीझन्सकडून होत आहे.