महाराष्ट्र राज्यात एकीकडे कोरोनाने हैदोस घातला असून परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली असताना दुसरीकडे मात्र राजकीय नेत्यांनी मात्र एकमेकांवर टिका करताना सर्व मर्यादा ओलांडल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. एकमेकांवर टिका करण्याच्या नादात त्यांचा जिभेवरील ताबा देखील सुटत चालला आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर वादग्रस्त टिका केल्यानंतर त्यांचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी "पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर", अशा शब्दांत संजय गायकवाडांवर सडकून टिका केली आहे.
"मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते," असे वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले होते. याला प्रत्युत्तर देत "देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांब राहिले. हे या गायकवाडला कोण सांगेल.. पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू, जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, कुठे घालायची तिथे घाल", अशा शब्दात टीका केली आहे.हेदेखील वाचा- Shiv Sena MLA Sanjay Gaikwad: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे वक्तव्य म्हणाले “करोनाचे जंतू सापडले असते तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते”
देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांबच राहिले..
हे या गायकवाडला कोण सांगेल..
पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू..
जंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर..
कुठे घालायची तिथे घाल..
— nitesh rane (@NiteshNRane) April 18, 2021
नेमकं काय होतं प्रकरण?
"मला जर करोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या तोडांत कोंबले असते, इतका तिरस्कार निर्माण झाला आहे," असे विधान शिवसेना (Shiv Sena) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केले आहे. फडणवीसांनी कोरोनावरुन राजकारण करु नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर ट्विटद्वारे हल्लाबोल केला आहे. "ऑक्सिजन नसल्यामुळे कांदिवलीतील ESIC हॉस्पिटलमधून सर्व कोरोना रुग्णांना घरी पाठवण्यात आले. परिस्थिती भीषण आहे आणि महाराष्ट्रातले बोलबच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करते आहे." असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.