Husband Attacks Wife: सुशिक्षित पत्नीवर पतीचा हल्ला, पुणे येथील मुकुंदवाडी परिसरातील घटना
Domestic violence | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

सुशिक्षित पत्नीवर पतीने हल्ला ( Husband Attacks Wife) केला आहे. ही घटना पुणे (Pune) येथील मुकुंदवाडी (Mukundwadi) परिसरातील राजीव गांधीनगर (Rajiv Gandhi Nagar) येथे घडली. धनंजय भरत अंबिले असे पतीचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास धनंजय यांनी पत्नीवर हल्ला केला. धनंजय अंबिले याच्या पत्नीचे शिक्षण एमए (MA) पर्यंत झाले आहे. सध्या नोकरी नसल्याने ती बेकार आहे. दरम्यान, पती-पत्नींमध्ये किरकोळ कारणावरुन वाद (Husband and Wife Fight) होतात. या वादातूनच त्याने हा हल्ला केला.

प्राप्त माहितीनुसार धनंजय याने जुने भांडण उकरुन काढत पत्नीसोबत पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. या दरम्यान, तू इतकी सुशीक्षित आहे. मग नोकरी का नाहीस करत? मला पैसे का नाही आणून देत? असे विचारले. यावर मी नोकरी शोधते आहे. लवकरच मला कोठेतरी नोकरी लागेल. नोकरी लागली की मी तुला पैसे आणून देईन, अशी समजूत आरोपीची पत्नी घालत होती. याच वेळी चिडलेल्या धनंजय अंबिले यांने थांब तुला मारुनच टाकतो, असे म्हणत. पत्नीवर चाकूहल्ला केला. आरोपीने पत्नीच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नीने तो हाताने हुकवला. मात्र, या झटापटीत तिच्या उजव्या हाताला आणि गळ्याला गंभीर जखम झाली. (हेही वाचा, मुंबई: चारित्र्याच्या संशयावरुन माथेफिरु पतीने पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या)

पतीला हल्ला करण्यापासून परावृत्त करण्यासाठी पत्नी वारंवार प्रयत्न करत होती. मात्र आरोपी हल्ला करतच होता. तो एकसारखे वार करत राहिला. अखेर शेजाऱ्यांनी मध्यस्थी करुन आरोपीला पकडले आणि हल्ला करण्यापासून रोखले. हल्ल्यादरम्यान पत्नीच्या डोके, हात आणि पोटाला गंभीर जखमा झाल्या. शेजाऱ्यांनी जखमी पत्नीला रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळतातच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी पती धनंजय अंबिले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.