Human Trafficking Case In Sion: 4.5 लाखात नवजात मुलीची तस्करी करण्याचा प्लॅन मुंबई पोलिसांनी उधळला; 2 जणी अटकेत
Child (Photo Credits: Pixabay) Representational Image

मुंबई (Mumbai) मध्ये अवघ्या 15 दिवसांच्या मुलीच्या तस्करीच्या प्रयत्नाचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये पोलिसांनी 35 वर्षीय महिला आणि तिचा साथीदार यांना अटक केली आहे. 4.5 लाखांमध्ये या मुलीची तस्करी (Human Trafficking Case) करण्याचा त्यांचा मनसुबा होता. Julia Fernandez ही प्रमुख आरोपी यापूर्वीदेखील मानवी तस्करीच्या प्रकरणामध्ये समोर आली होती.

Jayprakash Jadhav या Central Adoption Resources Authority चे सदस्य आणि कोंढवा मध्ये अडॉप्टेशन केंद्रामध्ये काम करणार्‍या व्यक्तीच्या तक्रारीवरून हा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईमधून एक महिला नवजात बालिकेच्या तस्करीसाठी ग्राहकाच्या शोधात असल्याची टीप त्यांना मिळाली होती. त्यांनी स्थानिक वूमन अ‍ॅन्ड चाईल्ड वेल्फेअर अथॉरिटीला अलर्ट केले.

मुंबई पोलिसांच्या एका विशेष टीमने सापळा रचून Fernandez ला पकडले. फोनवर तिने 4.5 लाखांची मागणी केली. 4 लाख कुटुबाला देऊन उर्वरित रक्कम स्वतःकडे ठेवली जाईल असं तिने म्हटलं. तिने जाधव यांना सायन कोळीवाड्यात अहाना नर्सिग होम मध्ये रविवारी येण्यास सांगितलं. जाधव पोलिसांना घेऊन आले होते. त्यामध्ये महिला कॉन्स्टेबल त्यांची पत्नी असल्याचं त्यांनी भासवलं.

नर्सिंग होम मध्ये 30 वर्षीय शबाना शेखने बाळ आणलं आणि आर्थिक व्यवहार पूर्ण करताच पोलिसांनी दोघींनाही पकडलं. या नर्सिंग होमचं रजिस्ट्रेशन देखील केलेले नव्हते. नक्की वाचा: धक्कादायक! मानवी तस्करीमध्ये देशात महाराष्ट्र अव्वल; राज्यात मुंबई, पुणे व ठाणे जिल्ह्यात सर्वात लोक गायब .

मिड डे च्या रिपोर्ट्सनुसार, Fernandez ने बाळाचे पालक दिल्लीचे असल्याचं म्हटलं आहे. बाळाला जन्मतः काविळ झाली होती. तेव्हा बाळाच्या आईवडिलांनी तिला Fernandez कडे सोडलं. आता बाळाला महालक्ष्मीच्या बाळ आशा ट्रस्ट मध्ये ठेवण्यात आले. सध्या बाळाच्या बायोलॉजिकल पॅरेंट्सचा शोध सुरु आहे.