Mumbai Local Mega Block 7 Nov: रेल्वे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रेल्वेकडून मेगाब्लॉक जाहीर
मुंबई लोकल ट्रेन(Photo Credits: PTI)

मध्य रेल्वेकडून रविवारी तांत्रिक कारणांमुळं मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभाग यांच्याकडून रविवारी 7 नोव्हेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागातील हार्बर आणि ट्रान्स मार्गावर मेगा ब्लॉक कार्यान्वित करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. मध्य रेल्वे दि. 7 नोव्हेंबर रोजी देखभालीचे काम करण्यासाठी हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेणार आहे. (हे ही वाचा Mumbai Local Ticket Rules: फक्त 'याच' लोकांना मिळणार मुंबई लोकलचे तिकीट, मध्य रेल्वेने केले स्पष्ट.)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4..40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 04.10 पर्यंत मेगा ब्लॉक असेल.

Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.34 ते सायंकाळी 4.47 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.43 पर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 4.58 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत आणि ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.19 वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेल करीता सुटणा-या आणि पनवेल/नेरूळ/वाशी येथून सकाळी 10.15 ते सायंकाळी 04.09 वाजेपर्यंत ठाण्याच्या सुटणाऱ्या अप सेवा बंद राहतील.