लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन असल्याचे म्हटले जाते. कोरोनामुळे मुंबईची लोकल ट्रेन थांबवण्यात आली असली तरी आता ती पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत उभी आहे. त्यात आता लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने आपल्या एका आदेशात स्पष्ट केले आहे की, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना दररोज तिकीट घेऊन लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यास मुभा आहे.
त्यानंतर आता मध्ये रेल्वेने एक आदेश जारी करत नक्की कोणाला ही तिकिटे मिळू शकतात ते स्पष्ट केले आहे. त्यानुसार लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झाले असणे गरजेचे आहे.
Please note:
Regarding issue of daily tickets to Mumbai suburban train passengers.👇@RailMinIndia pic.twitter.com/WzQxntw8im
— Central Railway (@Central_Railway) November 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)