पुण्याच्या येरवडा भागामध्ये महिन्याभरात 21 पाळीव प्राण्यांची सामूहिक हत्या झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघड झाला होता. आता या प्रकाराची माहिती असल्यास, गुन्हेगाराची ओळख किंवा माहिती देणाऱ्यास Humane Society International/India कडून 50,000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल अशी घोषणा करण्यात आली आहे. माहिती 8899117773 या क्रमांकावर देण्याचे आव्हान करण्यात आले आहे. 28 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यानच्या काळात विषबाधेतून प्राण्यांची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं आहे. महिन्याभरात पुण्यातील ट्रायडल नगर सोसायटीमध्ये 21 कुत्रे-मांजरी यांची हत्या, विषबाधेतून हत्या
येरवडा पुणे येथील ट्रायडल सोसायटीमध्ये या पाळीव प्राण्यांच्या हत्येचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. 14 कुत्रे आणि 6 मांजरांना विष देऊन त्यांना क्रुरपणे मारण्यात आलं आहे. प्राणीमित्रांच्या मदतीने हा प्रकार प्रकाशझोकात आला. त्यांनी रुग्णालयात या प्राण्यांचं पोस्टमार्टम केलं.
प्राण्यांबद्दल आकस असल्यासोबतच जर हे कृत्य एखादा मानसिक रुग्ण करत असल्यास भविष्यात सोसायटीमधील लोकांनाही त्याचा धोका असू शकतो. या भीतीतून जर कोणाला प्राण्यांची हत्या करणाऱ्या व्यक्ती, वस्तू, करणाबद्दल काही माहिती असल्यास ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल यांना ती वेळीच द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.