HSC Board Exam Results 2020: महाराष्ट्र HSC बोर्ड परीक्षेचा निकाल येत्या 10 जूनला जाहीर होणार नाही- वर्षा गायकवाड
Education Minister Varsha Gaikwad (PC - Twitter)

प्रत्येक वर्षी एचएससी (HSC) बोर्ड परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात येतो. परंतु यंदा कोरोना व्हायरसमुळे राज्यात लॉकडाऊनचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळेच हायकोर्टाच्या निर्णयानुसार एचएससी बोर्ड परीक्षेचा निकाल येत्या 10 जून 2020 रोजी जाहीर होणार असल्याचे म्हटले होते. तर सरकारने विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन निकाल जाहीर करावे असे म्हटले आहे. तर मुंबई लाईव्ह सोबत बोलताना महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गाडकवाड यांनी असे म्हटले आहे की, एचएससी (12 वी बोर्ड) परीक्षांचा निकाल थोडा उशिराने लागणार आहे. पण येत्या 10 जून रोजी जाहीर करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.(CBSE 10th, 12th Board Exam 2020 Dates: सीबीएसई बोर्डाचं दहावी, बारावीचं नवं वेळापत्रक जाहीर cbse.nic.in वरून करा डाऊनलोड!)

वर्षा गाडकवाड यांनी 12 वी बोर्ड परीक्षांचा निकाल लागण्याबाबत पुढे असे ही म्हटले आहे की, 10 जूनला निकाल जाहीर करणे शक्य नसून त्यासाठी अजून एका महिन्याचा कालावधी लागू शकतो. लॉकडाऊनमुळे पेपर तपासणीचे काम लांबणीवर पडत आहे. उत्तरपत्रिका पोस्ट ऑफिसमधून जमा केल्यानंतर त्या शिक्षकांकडे तपासणीसाठी पाठवल्या जात आहेत. पेपर तपासणीची ही प्रक्रिया 18 मे पासूनच सुरु झाल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. मात्र निकाल लावण्यासंबंधित विचार करण्यात येत असून जूलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाईल असे ही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.(10th and 12th Board Exam Results 2020 Dates: SSC, HSC प्रमाणेच CBSE, ICSE/ ISC बोर्ड परीक्षांचे यंदाचे निकाल कधी पर्यंत जाहीर होऊ शकतात?)

 लॉकडाऊनमुळे शिक्षण क्षेत्रातील विविध गोष्टींबाबतच्या प्रक्रिया अडून राहिल्या आहेत. तसेच पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांच्या परिक्षा सुद्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 31 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युनिव्हर्सिटीच्या अंतिम परीक्षा सुद्धा रद्द करुन विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात यावे असे म्हटले आहे.