UTS App-Universal Pass Linking: मुंबई लोकल प्रवासासाठी आजपासून युटीएस अ‍ॅप वर तिकीट बुकींग सुरू; पहा Universal Pass कसा करायचा लिंक?
Mumbai local (Photo Credits: Wikimedia Commons)

मुंबई मध्ये आता लोकल प्रवासासाठी नागरिकांना रेल्वे तिकीट किंवा पास काढण्यासाठी आता रांगेत उभं राहण्याची गरज नाही. प्रवासी यूटीएस मोबाईल अ‍ॅप (UTS Mobile App) वरूनच थेट तिकीट काढू शकणार आहेत. मात्र यासाठी प्रवाशांना नियमानुसार कोविड 19 लसीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक आहे. आज 24 नोव्हेंबर पासून ही सुविधा खुली करण्यात आली आहे. दरम्यान युनिव्हर्सल पास (Universal Pass) दाखवून जसं रेल्वे तिकीट ऑफलाईन उपलब्ध होत असतं तसेच आता ते ऑनलाईन देखील उपलब्ध होणार आहे. यासाठी रेल्वेनेच यूटीएस अ‍ॅप वर कोविन अ‍ॅप (CoWin App) च्या माध्यमातून युनिव्हर्सल पास लिंक करण्याची सोय दिली आहे. नक्की वाचा: Mumbai Local Train E-Pass: मुंबई लोकल ट्रेनचा Universal Travel Pass मिळवण्यासाठी epassmsdma.mahait.org वर कसा अर्ज करायचा? येथे मिळवा संपूर्ण माहिती .

मुंबई लोकलचं तिकीट आता युटीएस मोबाईल अ‍ॅप वर कसं बुक कराल?

  • मोबाईल मध्ये तुम्हांला यूटीएस मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करावं लागेल.
  • त्यानंतर तिकीटासाठी 'नॉर्मल बुकिंग' चा पर्याय आहे आणि पास साठी सीझन तिकीटचा पर्याय आहे.
  • तुमच्या आवश्यकतेनुसार पर्याय निवडून पेपरलेस आणि पेपर तिकीट याचा पर्याय तुम्हांला निवडायचा आहे.
  • त्यानंतर कोणत्या स्थानकातून कोणत्या स्थानकापर्यंत प्रवास करणार? सिंगल-रिटर्न जर्नी, क्लास आणि पेमेंटचा पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुम्हांला फेअर दाखवलं जाईल आणि पुढे तिकीट बुकिंगचा पर्याय दिसेल.
  • नंतर युनिव्हर्सल पास लिंक करण्यासाठी तुमचा कोविन बिनिफिअरी मोबाईल नंबर व्हॅलिडेट करावा लागेल.
  • तुमचा नंबर योग्य असेल तर तुम्हांला थेट तुमचा बेनिफिअरी नंबर, नाव दिसेल.
  • तो युनिव्हर्सल पास सिलेक्ट करून तुम्हांला तिकीट काढता येणार आहे.

दरम्यान जर मोबाईल नंबर वेगवेगळा असेल तर तुम्हांला एक ओटीपी नंबर दिला जाईल तो प्रत्येक वेळेस अपडेट करून तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे.

मुंबई मध्ये कोविड 19 लाटेच्या प्रभावानंतर सामान्य मुंबईकरांना रेल्वे प्रवास प्रतिबंधित करण्यात आला होता. मात्र 15 ऑगस्ट 2021 पासून कोविड 19 चे दोन्ही डोस घेतल्यानंतर 15 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचा लोकल प्रवासासाठी वाढता कल पाहता रेल्वेने यूटीएस अ‍ॅप द्वारा तिकीट बुकिंगची सोय खुली केली आहे.