Malabar Hill Elevated Trail । X @BMC

मुंबई मध्ये मलबार हिल (Malabar Hill) परिसरातील कमला नेहरू उद्यान (Kamala Nehru Park) आणि फिरोजशाहा मेहता उद्यान ( Ferozshah Mehta Garden) येथे झाडाझुडपांच्या सान्निध्यात उभारण्यात आलेला 'निसर्ग उन्नत मार्ग'  मुंबईकरांसाठी सशुल्क खुला करण्यात आला आहे. मुंबई मधील हे नवं आकर्षण केंद्र सध्या अनेक (Malabar Hill Elevated Trail) मुंबईकरांच्या बकेट लिस्ट मध्ये आलं आहे. मात्र या  'निसर्ग उन्नत मार्गाला' भेट द्यायची असेल तर त्यासाठी ऑनलाईन बुकिंग करावं लागणार आहे. एका स्लॉट मध्ये केवळ 200 जणांना प्रवेश दिला जात असल्याने याचं आगाऊ बुकिंग करावे लागत आहे.

'निसर्ग उन्नत मार्ग' ला सध्या नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने सारेच स्लॉट फूल आहे. अनेकांना सध्या स्लॉट उपलब्ध नसल्याने  बूकिंग शिवाय थेट   'निसर्ग उन्नत मार्गा'वर  आल्याने प्रवेशद्वारा वरूनच मागे फिरावे लागत आहे. म्हणूनच जाणून घ्या   मलबार हिल येथील   'निसर्ग उन्नत मार्गा'वर जाण्यासाठी बुकिंग कसं कराल?

 'निसर्ग उन्नत मार्गाला' भेट देण्यासाठी ऑनलाईन बुकिंग कसं कराल?

  • naturetrail.mcgm.gov.in ला भेट द्या.
  • त्यानंतर Book Now वर क्लिक करा
  • तारीख निवडा. त्याचे उपलब्ध टाईम स्लॉट निवडा आणि Next वर क्लिक करा.
  • पुढे तुमचे नाव, मोबाईल नंबर, इमेल आयडी विचारला जाईल.
  • Next वर क्लिक केल्यानंतर 25 रूपये फी भरा.

आता तुमचं बुकिंग पूर्ण झाले आहे. तुम्हांला हे तिकीट प्रवेशद्वारावर दाखवावे लागणार आहे. स्कॅन करूनच तुम्हांला आतमध्ये जाता येणार आहे. दरम्यान एका वेळेस केवळ 6 तिकीटं बूकिंग करता येणार आहे. दरम्यान तुम्हांला  'निसर्ग उन्नत मार्गाला' भेट देण्यासाठी सकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत वेळ आहे. निसर्ग उन्नत मार्गाला पहिल्या दिवशीच दीड हजारांहून अधिक लोकांनी भेट दिली आहे.