House Collapsed in Bandra: मुंबईतील वांद्रे येथील शेर्ले राजन रोडवरील एका इमारतीचा भाग कोसळला; बचावकार्य सुरू

मुंबईतील (Mumbai) वांद्रे (Bandraa) येथील शेर्ले राजन (Sherley Rajan Road) रोजवरील चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत एएनआय वृत्तसंस्थेने अग्निशमनदलाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली आहे. तसेच अग्निशमनदल, रुग्णवाहिका, स्थानिक पोलीस आणि त्या विभागातील महानगर पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही इमारत जवळपास तीन दशकांपासून रिकामी होती. मात्र, या इमारतीचा काही भाग लगतच्या निवासी इमारतीवर कोसळला आहे. ज्यात एक व्यक्तीला बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य सुरु आहे.

वांद्रे परिसरात पडलेल्या या रिक्त इमारतीचा एक भाग लगतच्या निवासी इमारतीवर कोसळला आहे. ज्यामुळे काही लोक जखमी होण्याची शक्यता सांगितली जात आहे. अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे देखील वाचा- Mumbai Fire: क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

एएनआयचे ट्वीट-

मुंबई येथील चेंबूर परिसरात 13 ऑगस्टला एका इमारतीचा एक भाग कोसळला होता. ज्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर, चार जण जखमी झाले होते. तसेच जुलै महिन्यात मुसळधार पावसामुळे मुंबईत 2 वेगवेगळ्या ठिकाणी इमारत कोसळण्याची घटना घडली होती. त्यावेळी 5 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, अनेकजण जखमी झाले होते.