Mumbai Fire: क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट (Crawford Market) परिसरात भीषण आग लागल्याची बातमी समोर येत आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, या आगीचे स्वरुप लक्षात घेता 8 अग्निशमन दलाच्या गाड्या (Fire Brigade) घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु असून ही आग कशामुळे लागली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. तसेच या आगीत काही जीवितहानी तसेच वित्तहानी झाली आहे का याबाबत ही कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, ही आग विझविण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. Mumbai Fire: लोअर परेल परिसरात रघुवंशी मिल कमाऊंड मध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या रवाना

दरम्यान जून महिन्यात लोअर परेल येथील (Lower Parel) रघुवंशी मिल कमाऊंड (Raghuvanshi Mills) मध्ये 25 जून दिवशी भीषण आग लागल्याचं वृत्त समोर आलं होते. दरम्यान मुंबई मिरर च्या वृत्तानुसार, सकाळी ही आग सेनापती बापट मार्गावर (Senapati Bapat Road) असणार्‍या एका कमर्शिअल इमारतीमध्ये भडकली होती.