Mumbai Fire: लोअर परेल परिसरात रघुवंशी मिल कमाऊंड मध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या रवाना
लोअर परेल येथील रघुवंशीमिल कमाऊंड मध्ये आज(25 जून) दिवशी भीषण आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे.
लोअर परेल येथील (Lower Parel) रघुवंशी मिल कमाऊंड (Raghuvanshi Mills) मध्ये आज (25 जून) दिवशी भीषण आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. दरम्यान मुंबई मिरर च्या वृत्तानुसार, आज सकाळी ही आग सेनापती बापट मार्गावर (Senapati Bapat Road) असणार्या एका कमर्शिअल इमारतीमध्ये भडकली होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 8 अग्निशमन दलाच्या गाड्या देखील रवाना करण्यात आल्या आहेत. सकाळी 9.28 च्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला समजली त्यानंतर तात्काळ फायर इंजिन्स रवाना झाले आहेत. मात्र लेव्हल 3 मध्ये त्याचं रूपांतर झालं आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. मात्र या आगीमध्ये तीन मजली इमारतीत आगीचा भडका उडाल्याने आजुबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. मुंबई: नरीमन पॉईंट परिसरात एका बँकेला भीषण आग, अग्निशमन दलाचे आग विझविण्याचे प्रयत्न सुरु.
ANI Tweet
Mumbai: Fire breaks out at a building in Raghuvanshi Mills of Lower Parel area; 8 fire tenders are at the spot. #Maharashtra pic.twitter.com/5PJKB7cmR8
— ANI (@ANI) June 25, 2020
घटनास्थळी अग्निशमन दल, रूग्णवाहिका यांच्यासोबतच 6 ज्म्बो टॅंकर देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत. थर्मल सेंसरच्या मदतीने आगीचं नेमकं स्थान शोधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अजूनही अग्निशमन दलाकडून कोणत्याही जीवितहानीचे वृत्त समोर आलेले नाही. आज सकाळी मुंबईमध्ये नरिमन पॉंईंट परिसरात देखील बॅंकेत आग लागल्याच्या काल रात्री पुण्यामध्ये कोंढवा परिसरात गॅरेजला आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 25, 2020 01:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

