हनी टॅपच्या जाळ्यात ओढून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार दिलीप मोहते-पाटील (MLA Dilip Mohite-Patil) यांच्या बदनामीचा कट सातारा येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणात सातारा येथे सातारा तालुका पोलीस (Satara Police) ठाण्यात तीन संशयीतांवर गुन्हा दाखल झाला आहे. आमदार दिलीप मोहिते-पाटील (Dilip Mohite-Patil) यांना हनी ट्रॅप (Honey Trap) करुन जाळ्यात ओढण्यासाठी ज्या तरुणीचा वापर केला जाणार होता. त्या तरुणीनेच या प्रकरणाचा भांडाफोड केल्याने आरोपींची मोहीप फत्ते होण्यापूर्वीच त्याला सुरुंग लागला. पोलिसानी गुन्हा दाखल केलेल्या संशयीत आरोपींमध्ये दोघे पुणे जिल्ह्यातील तर एक जण सातारा जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. या तिघांनी आमदार मोहिते पाटील यांचे हनी ट्रॅप करण्यासाठी रोख रक्कम आणि पुणे येथे फ्लॅट घेऊन देण्याचे आमिष तरुणीला दाखवले होते.
आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचे पुतणे मयूर साहेबराव मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शैलेश शिवाजी मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि. पुणे), राहुल किसन कांडगे (रा. चाकण, जि.पुणे), सोमनाथ दिलीप शेडगे (रा.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघा संशयीतांची नावे आहेत. आरोपींनी आमदार दिली माहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी एका युवतीला पुढे केले होते. या युवतीला रोख रक्कम आणि पुणे यथे फ्लॅट घेऊन देण्याचे अमिष दाखवले होते. आमदार मोहिते पाटील यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांना ब्लॅकमेल करायचे आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचे असा आरोपींचा डाव होता.
हनी ट्रॅपचा कट आरोपींनी ज्या तरुणीला पुढे करुन रचला त्या तरुणीचे आरोपींचा भांडाफोड केला. त्यानंतर हे प्रकरणा बाहेर आले. संबंधित तरुणी सातारा येथीलच असल्याचे समजते आहे. या तरुणीने दिलीप मोहिते पाटील यांचे पुतणे साहेबराव मोहिते पाटील यांना फोन करुन हनी ट्रॅपच्या कटाबाबत माहिती दिली. 22 एप्रिल रोजी या तरुणीकडून माहिती मिळताच साहेबराव यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित युवतीकडे सखोल चौकशी केली असता सर्व प्रकार पुढे आला.
दरम्यान, आमदार मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी आरोपींनी तरुणीला रोख रक्कम आणि पुण्यात फ्लॅट घेऊन देण्याचे अश्वासन दिले होते. त्यानुसार तरुणीला वेळोवेळी थोडीथोडी अशी मिळून साधारण 90 हजार रुपयांची रक्कमही दिली होती. परंतू, अखेर आपल्या आंतर्मनाला हा प्रकार पटला नसल्याने आपण आमदारांचे पुतणे व तक्रारदार मयूर यांना फोन करून सांगितल्याचे या तरुणीने पोलिसांना सांगितले.