Jitendra Awhad And Narendra Modi (Photo Credit: PTI/ Facebook)

नागरिकत्व दुरूस्ती कायदा (CAA) संपूर्ण भारतात लागू झाला असून या कायद्याच्या विरोधात अनेक अंदोलने केली जात आहे. यातच राष्ट्रवादी नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. राष्ट्रवादीने नुकतीच पुण्यातील (Pune) सारस बागेच्या शेजारी जाहिर सभा आयोजित केली होती. या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकार गंभीर शाब्दिक हल्ला चढवला आहे. भारतात नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवणी भारतात लागून करून मोदी सरकारने देशाच्या सविधानावर हल्ला केला आहे. महत्वाचे म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने भारताला एकत्र आणले आहे. त्यामुळे आता आंबेडकर स्वीकारायचे की गोळवलकर हे देशातील नागरिकांनी ठरवायचे आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

नागरिकत्व दुरूस्ती कायदा विरोधात देशातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. महत्वाचे म्हणजे, या कायद्यामुळे भारतातील नागरिकांच्या नागरिकत्वाला धक्का लागणार नाही. यासाठी भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या समर्थनार्थ अनेक मोर्चे काढले होते. यातच जितेंद्र आव्हाड यांनी पुणे येथे सभेत नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी संदर्भात भाष्य करून भाजपच्या मेहनतीवर पाणी ओतल्याचे दिसत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या सभेत कोरेगाव भीमा प्रकरणही संदर्भातही संवाद साधला. पोलीस सरकारच्या आदेशानेच चालतात. त्यामुळेच भीमा कोरेगाव हिंसाचार घडला, असा आरोपही आव्हाड यांनी केला. तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपच्या डोळ्यात खुपत आहे, असेही जितेंद्र आव्हाड त्यावेळी म्हणाले आहेत. हे देखील वाचा-महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे विभाजन होणे शक्य नाही' उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस- राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. त्यानंतर हे तिन्ही पक्ष भिन्न विचाराचे असून यांचे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी टिका विरोधांकडून वारंवार केली जात आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबतीत विधान करून नव्या वादाला आमंत्रण दिले होते. इंदिरा गांधीनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांच्या विरोधात कोणीही आवाज उठवायला तयार नव्हते. मात्र, अहमदाबाद, पाटणा येथील काही विद्यार्थ्यांनी हिंमत दाखवली होती. यानंतर जयप्रकाश यांनी अंदोलन पुकारले होते. आताही देशात तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जेएनयू, जामिया, जादवपूर विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. ते थेट सरकारला आव्हान देत आहेत. आता मात्र, त्यांची संख्या कमी आहे. मात्र, यातूनच नवे नेते समोर येतील, असे जितेंद्र आव्हाड बीड येथील संविधानसभेत म्हणाले होते.