
महाराष्ट्रातील पोलीस भरतीबाबत महत्वाची घोषणा करणारे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटीिल (Dilip Walse-Patil) यांनी राज्यातील कारागृहासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात काही नवीन कारागृह उभारण्याची आवश्यकता आहे. याबाबत आज मागणी झाली असून राज्यात नवीन कारागृह उभारण्याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार असल्याचे दिलीप वळसे पाटील म्हणाले आहे. तसेच कोरोनाची परिस्थितीनुसार काही कैद्यांना तरुंगातून सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कैद्यांसाठी कारागृहात उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, काही कैद्यांना तरूंगातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यात नवीन कारागृहाची निर्मिती करण्याबाबत लवकरच शासन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Raj Thackeray: अमित ठाकरे यांच्याकडे मनसे मोठी जबाबदारी सोपवणार? आदित्य शिरोडकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर MNS विद्यार्थी सेनेचे नेतृत्व करण्याची शक्यता
दरम्यान, सन 1960 पासून ते आजतागायत संप्रेषण क्षेत्रात विविध बदल झालेले आहेत. त्यानुसार राज्याचे पोलीस दल नेहमी तत्पर, कार्यक्षम, अचूक निर्णयक्षम म्हणून सर्वत्र परिचित आहेत. त्यामुळे राज्याच्या पोलीस दलाप्रती देशातील पोलीस दलाला नेहमी आदर वाटतो, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असेही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.