Kirit Somaiya | (Photo Credits: IANS)

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्या प्रकरणी एपीआय सचिन वाझे (API Sachin Vaze) यांना एनआयएने (NIA) अटक केली आहे. या अटकेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग (Mumbai Police Commissioner Paramvir Singh) यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओत त्यांनी म्हटले की, "सचिन वाझे यांना अटक झाली. पण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना तर जाब द्यावा लागणार आहे. आणि आता शिवसेनेचे प्रवक्ता ओसामा सचिन वाझेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता काय बोलणार आहेत? अजून काय काय बाहेर येणार? हे ही पाहायला हवं."

किरीट सोमय्या ट्विट:

तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना आयपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए) (बी) (आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली. दरम्यान, सचिन वाझे यांनी ठाणे कोर्टात अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला होता. मात्र कोर्टाने तो फेटाळून लावला. ('जगाला गुडबाय म्हणायची वेळ जवळ आली'; सचिन वाझे यांचे खळबळजनक व्हॉट्सअॅप स्टेटस)

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ चे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर सचिन वाझे वादात सापडले. त्याचबरोबर हिरेन यांचे कुटुंबिय आणि विरोधकांनीही सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. विधानसभा अधिवेशनातही हा मुद्दा प्रचंड गाजला. त्यानंतर सचिन वाझे यांची क्राईम ब्रॉंचमधून बदली करण्यात आली. अखेर काल सचिन वाझे यांना अटक झाली. विशेष म्हणजे यादरम्यान सचिन वाझे यांच्या खळबळजनक व्हॉट्सअॅप स्टेटसने सर्वांचे लक्ष वेधले होते.