मुंबईकरांची पहाट आज ढगांच्या गडगडाटाने आणि काही काळ जोरदार पावसाच्या सरींनी झाली. दरम्यान आज दिवसभर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस मुंबई शहर आणि उपनगरामध्ये बरसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्येच भारतीय हवामान खात्याच्या विभागाकडून मुंबई शहरात आज (23 जुलै) दुपारी 1 वाजून 43 मिनिटांनी भरती येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान या भरतीच्या वेळेस लाटांची उंची सुमारे 4.52 मीटर असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून समुद्राला भरतीच्या वेळेस नागरिकांनी शक्यतो किनार्यापासून दूर राहण्याचं आवाहन केले जाते. त्यासाठी पालिका प्रशासन आणि पोलिस कर्मचारी तैनात असतात.
मुंबईमध्ये काल रात्री झालेल्या पावसाची नोंद हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सांताक्रुझ- 49mm,वांद्रे- 24mm,राम मंदिर- 33mm,महालक्ष्मी- 14mm पावसाची नोंद मागील 24 तासांमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान मुंबई प्रमाणेच ठाणे आणि नवी मुंबईमध्येही पावसाचा धुव्वाधार जोर पहायला मिळाला आहे. Maharashtra Monsoon 2020: मुंबई सह उपनगरांमध्ये काल रात्री हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसला; कोकणात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज- IMD.
मुंबई मध्ये आज भरतीची वेळ
High tide of 4.52 meters expected at 1343 hours in Mumbai today: India Meteorological Department
— ANI (@ANI) July 23, 2020
दरम्यान मुंबईमध्ये येत्या काही तासांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला नसला तरीही कोकण आणि राज्यातील काही अंतर्गत भागांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस मध्यम स्वरूपाचा असेल असे देखील मुंबई हवामान वेधाशाळेने वर्तवले आहे.
मुंबईमध्ये उपनगरांमध्ये पाऊस बरसत असला तरीही तलाव परिसरात अपेक्षेप्रमाणे पाऊस पडत नसल्याने सध्या मागील वर्षीच्या तुलनेत मुंबईच्या सातही तलावांमध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे. अद्याप पालिकेने पाणीकपात जाहीर केलेली नसली तरीही त्यांनी ते या गोष्टीकडे लक्ष ठेवून असल्याचं समजते आहे.