Monsoon 2020 | Image used for representational purpose only | (Photo Credits: IANS)

गेल्या आठवड्यात धो-धो बरसून मुंबईला चिंब केल्यानंतर 2-3 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान अधून मधून पावसांच्या सरी अनुभवायला मिळत आहेत. काल रात्री देखील मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तसंच ठाणे, नवी मुंबईतही मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळला. तर कोकण आणि जिल्ह्यातील आतील भागात मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली. तसंच कोकण पुन्हा एकदा व्यापण्यासाठी पाऊस सज्ज झाला आहे. अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

के.एस.होसाळीकर यांच्या माहितीनुसार, काल रात्री मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. काल रात्री मुंबईतील उपनगरांमध्ये झालेल्या पाऊसाची नोंद पुढील प्रमाणे:

# सांताक्रुझ- 49mm

# वांद्रे- 24mm

# राम मंदिर- 33mm

# महालक्ष्मी- 14mm

K. S. Hosalikar Tweet:

यंदा महाराष्ट्रात 10 जून रोजी मान्सूनचं आगमन झालं असून त्यानंतर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला. यामुळे राज्यातील शेतकरी सुखावला असून सर्वसामान्यही दिलासा मिळाला आहे. दरम्यान यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.