प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: ANI)

मुंबईतील धारावीत (Dharavi) पोलिसांनी एका ड्रग पॅडलरकडून जवळजवळ 1.20 किलोग्रॅमचे हेरोइन जप्त केले आहे. ज्याची किंमत 2.40 कोटी रुपये आहे. घाटकोप पोलिसांच्या अँन्टी नारकोटिक्स सेलच्या एका अधिकाऱ्याने गुरुवार ही महिती दिली आहे. ड्रग्ज डिलिव्हरी बद्दल माहिती मिळाल्यानंतर एएनसीच्या एका टीमने बुधवारी दुपारी धारावी 60 फीट येथून पॅडरला पकडण्यासाठी कट रचला. संयुक्त पोलीस मिलिंद भारांबे यांनी असे म्हटले की, पॅडलर हा अन्य पॅडलर्स किंवा ग्राहकांना ड्रग्ज देण्यासाठी पोहचला.

टीममधील सदस्यांनी पॅडलरला 1.20 किलोग्रॅम ड्रग्ज पॅकेट्सह पकडले. ज्यामध्ये हेरॉइन असल्याचे मिळाले. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 2.40 कोटी असल्याचे सांगण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्य पॅडरचे नाव मंजर डी. शेख रुपात झाली आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. काही महत्वपूर्ण गोष्टींव्यतिरिक्त शेखने शहर आणि उपनागरात ड्रग्ज पॅडलर्स आणि ग्राहकांसाठी एका मोठ्या नेटवर्कचा खुलासा केला आहे. त्यानंतर याबद्दल तपास केला जात आहे.(पुण्यात दिवसाढवळ्या वाळू पुरवठा व्यावसायिकावर भररस्त्यात गोळीबार, गोळी गालाला चाटून गेल्यावर थोडक्यात बचावले)

पोलिसांनी असे म्हटले आहे की, 2018 मध्ये एएनसी घाटकोपर युनिटने याच प्रकारचे ड्रग्ज प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, यापूर्वी मुंबईतील अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आणला होता. मुंबई कस्टम आणि डीआरडीएने न्हावा शेवा पोर्ट ट्र्स्टवर कार्गो कंटेनर मधून जवळजवळ 1,000 कोटी रुपयांच्या किंमतीचे 191 किलोग्रॅम हेरॉइन जप्त केले होते.